Std. XII Activity Work Book

Activity Work Book for XII New syllabus (With Marathi Translation) is available for sale. Do buy it as early as possible. Price Rs. 400 + 50 (Packing and Postage charges)= Rs.450. Discount is available on buying 25 and more copies < Contact Writer:- Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon. Whats app Number: 9850737199 , Cell 9850737199. Pages in the book- 400


English Grammar Activity Workbook First Edition (for class 8 to 12) is available for sale. Price Rs. 220 + Rs. 50 (Postage / Courier Charges) = Rs. 270. Discount is available for buying 30 or more books. Contact Writer: Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon Whats app Number: 9850737199

Search in This Blog

Showing posts with label Kind words - Inspiring words. Show all posts
Showing posts with label Kind words - Inspiring words. Show all posts

Tuesday, 28 April 2020

Kind words - Inspiring words

Kind words - Inspiring words

Prof. R.D.Dhumal, Jr. College,Jaysingpur Dist. Kolhapur


सुप्रभात!
वेळ नसेल तर ही विनंती वेळ काढून वाचाच........
दोन शब्द Group Leader तुषार सरांसाठी........
लेख सुरू करण्यापूर्वीच.......
Many Many Hats off ! Tushar Sir.🙏🙏
मला नीटस आठवत पण नसेल पण माझ्या मते सोमवार दि.22 आक्टोंबर, 2018 हा वाँटस अँप ग्रुप तुम्ही तयार केला आणि या ग्रुपचा मी एक सदस्य झालो. खरोखरचं एखाद्या तळ्यातुन मोठ्या महासागरात आल्यासारखं वाटले. तुमचे शतशः आभार🙏
एका राज्यस्तरीय व्यासपीठावर काम करण्याची एक संधीच तुम्ही आम्हा सर्व शिक्षकांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर आपण या ग्रुपच्या माध्यमातून बरचं काही स्वरचीत साहित्य आम्हाला उपलब्ध करुन दिले व आज अखेर देत आलेले आहात. अगदी पाठयपुस्तकाच्या अणुक्रमणिकेपासुन वार्षिक नियोजन व पुढे अगदी 12वी च्या परीक्षेच्या नमुना उत्तर पत्रिकेपर्यंत सर्व काही वेळोवेळी ग्रुपवर शेअर केले. कोणाच्याही प्रतिसाद व प्रतिक्रिया यांना तुम्ही केवळ आपल्या कामातूनच उत्तर दिले.त्यानंतर यात आणखी भरच पडली जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग तयार केला. आणखी कार्यक्षमतेने व तत्परतेने तुमची घोडदौड सुरु झाली. अगदी एका क्लिकवर अक्षरशः माहितीचा स्त्रोत तुम्ही आम्हा महाराष्ट्रातील इंग्रजी शिक्षकांना हातोहात उपलब्ध करून दिला. यासाठी तुम्हाला माझ्या शिक्षक परिवाराकडून मानाचा मुजरा.
आपले सर्व साहित्य आम्हाला वेळोवळी मार्गदर्शकच ठरले. Virtual Teaching and Learning काय असते याची कल्पना आली. हे सर्व करत असताना किती आपार कष्ट घ्यावे लागले असतील याची रास्त जाणीव मलाही आहे.

तुमच्या या प्रवासात मात्र वारंवार एक गोष्ट जानवत होती की आपण ही कांहीतरी केले पाहिजे निदान खारीचा वाटाच सही... म्हणून मी एके दिवशी तुम्हाला फोनवरून संपर्क साधला व तुमच्या या धाडसी व सर्व समावेशक प्रयत्नाचे कौतुक ही केले. फक्त इच्छा होती सोबत काम करण्याची. तुम्ही ही अतिशय शांतपणे माझं ऐकून घेतले. तेथून पुढे मी या ग्रुपवर सक्रिय झालो.
पण आज अखेर एकच गोष्ट लक्षात येते की सदर सर्व ग्रुपमध्ये सक्रियपणे सहभाग घेणाऱ्या शिक्षकांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच असते व याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी सुचवले ही पण आपण आपले प्रयत्न थांबवले नाहीत. उलट ते अधिक वाढतच गेले. प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद कसा दयावा हे मी तुमच्या कडुनच शिकलो. यातुन माझ्या वर्तनातही बदल घडून आला. ज्ञानप्राप्ती बरोबरच संयम, शांतपणा व सहनशीलता या मुल्यांची छाप अगदी नकळतपणे माझ्यावर पडली. कधी कधी तर irrelevant post आल्या नंतर मी तुम्हाला सुनवले सुध्दा व संबंधित शिक्षकाला ग्रुपवरुन काढुन टाकण्याचा आग्रह ही धरला. कारण इतके ग्रुप तयार करून तुम्ही स्वतः च्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका निर्माण करत आहात हे ही बोललो. तरीही तुम्ही शांतच! मग मला सहिष्णुता जाणवली. यातच भर घातली ती A. G. Gardiner यांनी लिहलेल्या त्यांच्या On Saying Please ने यामधुन संयम, वाकचातुर्य आणि  सामाजिक वर्तन यातुन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे मार्गदर्शन मिळाले.
याच  बरोबर मला जाणवते की तुषार सरांचा दिवस ही 24 तासांचा असतो, त्यांना ही शाळेची कामे असतात, त्यांना ही कौटुंबिक जबाबदारी व नातेवाईक व कौटुंबिक समारंभआहेत व देव न करो पण किरकोळ ताप सर्दीचा त्रास होतो. मग या सर्वातून ते इतका वेळ देत असतील तर खरोखरच आपल्याला विचार केला पाहिजे. शिवाय आपल्या प्रत्येकामध्ये एक 'तुषार सर' दडलेला आहे याचा शोध घेता आला पाहिजे व तो शिक्षक बाहेर आणता आला पाहिजे. पण यावर  बरेच जण प्रतिक्रिया देतील की तुषार सरांचा Motive हो प्रत्येकाने आपला आपला  Motive ठरवायचा असतो.निदान इतर सर्व क्षेत्रे सोडा पण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात तर आपल्याला आपले निदान 70% योगदान देता आले पाहिजे. आपल्या विषयात 24×7 रममाण होता आले पाहिजे पण काम नव्हे.. Plz, Don't misunderstand.
जाता जाता पुढे एकच गोष्ट महत्त्वाची की छत्रपतींच्या या महाराष्ट्रात त्यांचा निदान एक विचार अंगी बाणवु तो म्हणजे , "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे."
मग प्रश्न उरतो तो आपले पोशिंदे कोण?
माझा विषय, माझे विद्यार्थी, माझी संस्था व आपले सरकार हेच ते माझे खरे पोशिंदे ज्यांच्या जीवावर मी या समाजात स्वाभिमानाने व समर्थपणे जगत आहे.
हे संस्कार, स्वाभिमान व सामर्थ्य केवळ स्वतः मध्ये अंगीकार करून न थांबता पुढे विद्यार्थ्यांमध्ये ही रुजविण्याची जबाबदारी माझीच आहे इतकी जाणीव .......एवढीच अपेक्षा🙏
जर कांहीं खाली-वर झाले असेल तर..............मनापासून क्षमस्वः🙏🙏
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद... पण आता थोडं चिंतन....व शेवटी मला खात्री आहे याचे अनुनयन/अंगीकार 🙏🙏🙏

Prof. Vaishali Jane, Nagpur

Sir,
 I have the same thought in my mind.
How energetic and knowledgeable teacher he is!
Really, he deserves everyone's appreciation.

Prof. Nalini Manik, Nagpur
Absolutely true madam!
Tushar sir has not only given us the guidelines and resources but also created a good platform for the teachers for discussion.

Prof. Sachin Niakam, Rashtriya Jr. College, Chalisgaon
Sometimes I feel Tushar Sir is not from our planet. He is very dedicated and devoted to his great efforts. He humbly denies the credit of his hard work and always gives credit to others. Definitely he is our Captain and we all are his sailors. A question is often asked where is God. I see God in people like Tushar Sir. He is the perfect epitome of the Almighty. Very dedicated, simple, and humble. Hats off to your great work Sirji! 👍👍💐💐

Prof. Sham Gujar, Chopada
Tushar Sir is hardnut to crack,striving for the group night and day.Did you get the time to eat and rest Tushar Sir?

Prof. Nitin Puri
Yes,he is not bosslike. He is a true leader who encourage people and get the good things done,binding so many in a group.Hats off to you ,Sir👍🏻👍🏻👍🏻