Std. XII Activity Work Book

Activity Work Book for XII New syllabus (With Marathi Translation) is available for sale. Do buy it as early as possible. Price Rs. 400 + 50 (Packing and Postage charges)= Rs.450. Discount is available on buying 25 and more copies < Contact Writer:- Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon. Whats app Number: 9850737199 , Cell 9850737199. Pages in the book- 400


English Grammar Activity Workbook First Edition (for class 8 to 12) is available for sale. Price Rs. 220 + Rs. 50 (Postage / Courier Charges) = Rs. 270. Discount is available for buying 30 or more books. Contact Writer: Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon Whats app Number: 9850737199

Search in This Blog

Sunday, 22 June 2025

How to prepare English for Board Exam

How to prepare English for Board Exam

How to prepare English for Board Exam- Know more about it

How to prepare English for Board Exam


12th Board Exam : Preparation for English Subject

बारावी बोर्ड परीक्षा : इंग्रजी विषयाची तयारी

- डॉ. महेश अरुण काळे

नमस्कार विद्यार्थी मित्रहो,      

आपण सर्वजण ११ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासात मग्न असालच. पहिला पेपर इंग्रजीचा आहे. इंग्रजीचा पेपर म्हटले की आपल्याला दडपण येते कारण आपल्या मनात इंग्रजीविषयी अकारण भीती निर्माण झालेली असते. ही भीती दूर करण्यासाठी मी तुम्हाला कमी कालावधीत इंग्रजी विषयाची तयारी कशी करता येईल, याविषयी माहिती सांगणार आहे.

आपणा सर्वांना माहित आहे की इंग्रजी विषयाचा पेपर 100 गुणांचा असून त्यापैकी 80 गुण लेखी परीक्षेसाठी तर 20 गुण तोंडी परीक्षेकरीता आहेत.

लेखी परीक्षेत जर आपल्याला उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील तर सर्वप्रथम आपण कृतिपत्रिकेच्या (Activity Sheet) स्वरूपाचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.

80 गुणांसाठी असलेल्या कृतिपत्रिकेचे चार विभागात वर्गीकरण केलेले आहे.

ते विभाग पुढीलप्रमाणे:     

अ) गद्य विभाग

34 गुण        

ब) पद्य विभाग  

14 गुण         

क) लेखन कौशल्य विभाग

16 गुण                                       

ड) कादंबरी विभाग

16 गुण

 

कोणता विभाग किती गुणांसाठी विचारला जातो हे माहित असणे फारच आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विभागातील उपघटकाचे गुणविभाजन ही माहित करून घ्यावे. यामुळे आपल्याला या घटकांचा आणि उपघटकांचा अभ्यास कसा करावा याचे नियोजन व्यवस्थित करता येईल.

अभ्यासाचे नियोजन:-          

अ) गद्य विभाग:-                          

या विभागात आपल्याला एक सीन (पाठ्यपुस्तकातील) उतारा आणि एक अनसीन (पाठ्यपुस्तका बाहेरील) उतारा विचारलेला असतो. याबरोबरच व्याकरणाशी संबंधित दोन वाक्ये असतात. शब्दसंग्रह साठी पण कृती दिलेली असते.

सारांश लेखन आणि माईण्ड मॅपिग हे घटक ही विचारले जातात.

या विभागाचा अभ्यास करताना आपण दररोज 1 किंवा 2 उतारे सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. हे प्रमाण आपण आपल्या उपलब्ध वेळेनुसार वाढवू शकता. यामुळे आपल्याला उताऱ्यात उत्तरे शोधण्याचा चांगला सराव होईल. या सरावामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

उतारे सोडवत असताना आपण एक काळजी अवश्य घ्यावी ती म्हणजे आपण अगोदर ॲक्टिव्हीटी (प्रश्न) वाचाव्यात व नंतर उतारा वाचावा. यामुळे निश्चितच वेळेची बचत होईल. एक-एक ॲक्टिव्हीटी वाचून लगेच उताऱ्यात त्याचे उत्तर शोधल्यामुळे आपला वेळ वाचतो.

पर्सनल रिस्पॉन्सचे उत्तर लिहिताना आपण आपले वैयक्तिक मत मांडत असतो. ते मांडत असताना आपण सकारात्मक असणे आवश्यक आहे. उतारे सोडविण्याचा सराव झाल्यामुळे व्याकरण, शब्दसंग्रह आणि सारांश लेखनाचा ही आपोआप अभ्यास होतो.

या विभागात असलेल्या माईण्ड मॅपिंग या घटकाचा ही सराव करावा. या घटकाची पाठ्यपुस्तकात व इतर पुस्तकातील उदाहरणे सोडवावीत.

अशाप्रकारे आजपासुन जरी आपण दररोज 2 उतारे सोडविण्याचा सराव केला तरी वार्षिक परीक्षेपर्यंत 50 ते 60 उतारे सोडविण्याचा सराव होईल. यामुळे इंग्रजी विषयाची वाटणारी भीती निश्चितच कमी होऊन आपले मनोबल वाढेल.

ब) पद्य विभाग:-                               

या विभागात 10 गुणांसाठी 1 सीन उतारा व 4 गुणांसाठी एक कविता रसग्रहणासाठी विचारली जाते. या विभागाची तयारी आपण गद्य विभागाप्रमाणे करू शकता. अभ्यासक्रमात एकूण आठ कविता आहेत. दररोज 1 कवितेचा अभ्यास केला तर आठ दिवसात या विभागाचा अभ्यास आपण पूर्ण करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणाला सर्व कवितांचा आशय माहित असणे आवश्यक आहे. याचा फायदा आपल्याला कवितेचे रसग्रहण करण्यासाठी नक्कीच होतो. ही ॲक्टिव्हीटी  सोडविण्यासाठी आपल्याला मुद्दे पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपण कवितेचे रसग्रहण करावे.

फिगर्स ऑफ स्पीच / पोईटीक डीव्हाईस घटक 2 गुणांसाठी आहे. यासाठी आपण कवितेत आलेले सर्व संदर्भ शोधून माहित करून घ्यावेत.

पोएटिक क्रिएटिव्हिटी हा घटक ही 2 गुणां साठी विचारला जातो. यामध्ये आपल्याला एखाद्या विषयावर चार ओळींची कविता लिहायला सांगितले जाते किंवा काही ओळी देऊन कविता पूर्ण करण्यास सांगितले जाते. थोडक्यात येथे तुम्हाला तुमच्यामधील दडलेला कवी दाखविण्याची संधी निर्माण करुन दिलेली आहे.

क) लेखन कौशल्य विभाग: -    

या विभागात ए, बी, सी आणि डी असे चार घटक आहेत. प्रत्येक घटकात तीन लेखन कौशल्ये दिलेली आहेत. म्हणजेच आपल्याला एकूण बारा लेखन कौशल्यांचा अभ्यास करायचा आहे.

वर्षभर आपण या बारा लेखन कौशल्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. परंतु वार्षिक परीक्षा काही दिवसांवर आलेली आहे. आता आपण ए, बी, सी आणि डी या चारही घटकातील प्रत्येकी एक याप्रमाणे लेखन कौशल्यांची निवड करावी.

जे लेखन कौशल्य आपल्याला आत्मविश्वासाने सोडविता येईल असे वाटते त्याचीच निवड करावी. निवडलेल्या लेखन कौशल्यांचा आपण सखोल अभ्यास करावा. आपणाला एकुण 12 लेखन कौशल्यांतून प्रत्येकी घटकांतून एक (ए मधुन 1, बी मधुन 1, सी मधुन 1 आणि डी मधुन 1) याप्रमाणे केवळ चार लेखन कौशल्यांची निवड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अन्य लेखन कौशल्य ही तयार करून ठेवा. कधी कधी आपण चांगले तयार करून ठेवलेल्या लेखन कौशल्यावर आलेला प्रश्न परीक्षेत अवघड वाटला तर पर्याय उपलब्ध असला पाहिजे.

या विभागाचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत म्हणजे आपण दररोज केवळ एकच लेखन कौशल्याचा सराव करावा. चार दिवसात चार लेखन कौशल्यांचा अभ्यास पूर्ण होईल. एक लेखन कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला केवळ अर्धा ते एक तास पुरेसा आहे. या विभागाचा अभ्यास करताना ॲक्टिव्हीटी कश्या विचारल्या जातात व त्यांची उत्तरे कशी लिहावीत हे समजून घेऊन लिखाणाचा सराव करावा. हा विभाग आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो.

ड) कादंबरी विभाग: -              

या विभागात ही ए, बी, सी आणि डी असे चार घटक आहेत.

ए या घटकामध्ये हिस्टरी ऑफ नॉवेल या भागावर ऑब्जेक्टिव प्रश्न विचारले जातात. तर बी, सी, आणि डी या घटकांमध्ये प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर या घटकांवर प्रश्न विचारले जातात. यामुळे कादंबरीचा अभ्यास करताना वरील घटकांवर जास्त लक्ष केंद्रित करावे.

या विभागात दिलेल्या सर्व कादंबरीचा सारांश आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कादंबरी अभ्यासताना त्यातील मेजर कॅरेक्टरवर जास्त भर द्यावा. तसेच कादंबरीत घडणारे महत्वाचे प्रसंग लक्षात ठेवावेत. प्रत्येक कादंबरीच्या शेवटी दिलेली ब्रेनस्टॉर्मिंग ही ॲक्टिव्हीटी वारंवार सोडविण्याचा सराव करावा. यासाठी आपण दररोज एक कादंबरीचा सखोल अभ्यास करावा. म्हणजेच चार दिवसात या विभागाचा अभ्यास पूर्ण होईल.

थोडक्यात आपण दररोज इंग्रजी विषयासाठी किमान एक ते दीड तास वेळ द्यावा. या पद्धतीने आजपासून जरी अभ्यास केला तरी नक्कीच आपला आत्मविश्वास वाढेल व इंग्रजी विषयाची भीती निघून जाईल. चला तर मग अभ्यासाला लागा.

अ) गद्य विभाग 

दररोज एक किंवा दोन उतारे सोडविणे

अर्धा तास किंवा एक तास     

ब) पद्य विभाग 

दररोज एक किंवा दोन उतारे सोडविणे

अर्धा तास किंवा एक तास

क) लेखन कौशल्य

दररोज एक लेखन कौशल्य अभ्यास

अर्धा तास

ड) कादंबरी विभाग

दररोज एक कादंबरीचा अभ्यास

अर्धा तास

 

उत्तरपत्रिका लिहिताना करावयाचे वेळेचे नियोजन:-

उत्तरपत्रिका लिहिताना आपण वेळेचे भान ठेवणे आवश्यक आहे. पेपर संपल्यानंतर विद्यार्थी सांगतात की वेळच पुरला नाही. यासाठी आपण वेळेचे नियोजन व्यवस्थित केले तर आपल्याला नियोजित वेळेत पेपर संपविता येईल. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, हे ठरविणे आवश्यक आहे.

आपण पुढीलप्रमाणे वेळेचे नियोजन करू शकता.           

गद्य व पद्य विभागावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकी 20 मिनिटांचा वेळ घेऊ शकता.

लेखन कौशल्य व कादंबरी विभाग यावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकी 10 किंवा 15 मिनिटे वेळ घेऊ शकता.

खालील पद्धतीने वेळेचे नियोजन करता येईल-

 


प्रश्न क्रमांक 1


30 मिनिटे


प्रश्न क्रमांक 2


35 मिनिटे


प्रश्न क्रमांक 3


25 मिनिटे


प्रश्न क्रमांक 4


40 मिनिटे  


प्रश्न क्रमांक 5


40 मिनिटे


एकूण


170 मिनिटे


राहिलेल्या 10 मिनिटात आपण लिहिलेली उत्तरे वाचून त्यातील चुका (असतील तर) दुरुस्त कराव्यात. तसेच उत्तरातील महत्त्वांच्या शब्दांना अधोरेखित करावे.

नियोजित वेळेपूर्वी परीक्षा कक्षाच्या बाहेर न येता आपण लिहिलेल्या उत्तरात आणखी काही मुद्द्यांची भर घालण्याचा प्रयत्न करावा.

याप्रमाणे आपण घरी वेळ लावून वार्षिक परीक्षेपूर्वी किमान दोन ते तीन ॲक्टिविटी शीट सोडविण्याचा सराव करावा.

परीक्षेपूर्वी सोडवलेल्या ॲक्टिव्हीटी शीट विषय शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात.

अशाप्रकारे आपण नियोजनबद्ध अभ्यास केला तर आपली इंग्रजी विषयाची तयारी उत्तम होईल. आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.      

परीक्षेत घवघवीत यश मिळविण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. 'गुण'वंत व्हा. 

डॉ. महेश अरुण काळे

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती.

मो. 9405548692

makalejam@gmail.com

See More-

HSC Board All Activity Sheets


इंग्रजी विषयाच्या विशेष तयारी साठी खालील ॲक्टिव्हीटी वर्क बुक चा वापर करा. आदर्श उत्तर शेवटी दिलेली आहेत. त्याचा वापर करून स्वत: आपले उत्तर तपासता येते.



How to prepare English for Board Exam-

1) Read the textbook content thoroughly.

2) Remember the content of each topic.

3) Concentrate on the format of activity sheet.

4) Solve maximum activity sheets on each topics.

5) Pay attention to writing skill topics and their formats.

6) Use all good online resources.

Planning as per the questions and available time


Guidelines for dealing with novel and writing skill section



How to get good marks in English in Board Exam 


General Instructions :  
1) Maintain the sequence of questions and activities.  
2) Write answer of new question on a new page.  
3) Spelling, sentence structure must be correct.  
4) Essential things:  
i) Systematic diagrams  
ii) Legible handwriting  
iii) Brevity and clarity in expression  
iv) Neat and clean paper.
Important instructions:
1) Multiple answers to the same activity will be treated as wrong.  
2) Supplements are not recommended.  
3) Answers must be in full sentences.  
4) Web diagram, flow chart, tree diagram, table must be presented exactly in answers.  
5) Use of colour pens/pencils is not allowed.  
6) Do not write instructions of the activities or all given options.
Remember this  
1) Read the instructions carefully.  
2) Don't write instructions. It's waste of time.  
3) Don't spend time in writing options.  
4) Write answers directly.  
5) Write the number of questions and activities correctly.  
6) Write number of the question in the box.  
7) Write number of the activity in the margin.  
1. Dealing with Activity  
Activity: Choose  
Choose two correct statements related to the theme of the extract.  
Note that-  
1) Write down only two options.  
2) Don't write three. It will give zero marks.  
3) It's not true or false. It’s searching appropriate two statements showing the central idea of the extract.
2. Dealing with Activity
Activity: True or False
Rewrite the statements and state whether they are true or false.  
Note that-
Do not write as given below:  
1) True  
2) False  
3) False  
4) True  
Write statements and then state whether they are true or false. Only writing true or false will give zero marks.  

Correct method for writing answer:  
1) Abraham Lincoln wants his son to accept the failure also gracefully - True  
Or  
2) Abraham Lincoln wants his son to accept the failure also gracefully.  
-True

3. Dealing with Activity

Match the following Question :

Column A

Column B

1) Frankenstein

a) Thomas Mann

2) Miss Marple

b) Merry Shelly

3) Death in Venice

c) Jonathan Swift

4) Gulliver's Travel

d) Agatha Christie

 

 

Match the following:
Wrong method of writing answer:
1) -------- b
2) -------- d
3) -------- a
4) -------- c
Do not show answer using arrows or zig-zag lines. It is not allowed. It will get zero marks.

Correct method of writing answer-

Column A

Column B

1) Frankenstein

b) Merry Shelly

2) Miss Marple

d) Agatha Christie

3) Death in Venice

a) Thomas Mann

4) Gulliver's Travel

c) Jonathan Swift

 

 

4. Dealing with Activity
Fill in the blanks.
Note that-
1) Write down complete sentences and underline the answers.
2) Only answers without answers will not gain marks.

Activity- Fill in the blanks
1) My sincere thanks-----------the members----------Vishwabharti family.
(Insert appropriate prepositions)

Wrong method-
Answer-
to, of

Correct method
Answer-
My sincere thanks to the members of Vishwabharti family.
5. Dealing with Activity
Activity- Choose the correct option.

Note that-
If options are given, don't write all options.
Write only correct option.

Activity-
He is doing it.
(Choose the alternative showing the correct tense used here.)
a) Present perfect tense
b) Past progressive tense
c) Present progressive tense.
d) Simple present tense

Answer-
c) Present progressive tense
6. Dealing with Activity
Personal Response Activity :
Que 1A -- A4
Que 2A -- A4
Que 3A -- A3
Note that-
Do not write answer more than 50 words.
You are at liberty to write your response.
Do not spend time in writing long and lengthy answer.

7. Autobiographical passages :

Note that-

1) Be careful. Don't copy out as it is.

2) Convert into third person narration.

I

The writer/he/she

My

His/her

Me

Him/her

We

They

Our

Their

Us

Them

 ----------------------------------------------------------------------------

Read this also-

Mind Mapping


How to get good marks in English Subject

How to get good marks in English Subject

How to get good marks in English Subject


Suggestions for scoring maximum marks in English Subject in the coming HSC Board Exam

बारावी इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावेत या साठी सूचना.

Important Tips-

English Exam Preparation Guidelines for HSC Students

1. Understand the Syllabus:

Start by thoroughly understanding the syllabus. Focus on prose, poetry, drama, grammar, and writing sections. Pay attention to the weightage of each section.

अभ्यासक्रम नीट समजून घेऊन सुरुवात करा. गद्य, कविता, नाटक, व्याकरण आणि लेखन विभागांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक विभागाच्या गुणांकडे लक्ष द्या.

2. Practice Reading Comprehension:

Regularly practice reading comprehension passages. Focus on understanding the main idea, tone, and specific details. This will help improve your reading speed and accuracy.

नियमितपणे परिच्छेद वाचण्याचा व आकलन चा सराव करा. मुख्य कल्पना, शैली आणि विशिष्ट तपशील समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. यातून तुमची वाचन गती आणि अचूकता सुधारेल.

3. Master Writing Skills:

Work on e -mail writing, drafting a virtual message, interview writing, review writing, compering, appeal, blog and report writing. Ensure your answers are well-structured with clear introductions, body paragraphs, and conclusions. Practice different formats and styles.

ई-मेल लेखन, आभासी संदेशाचा मसुदा तयार करणे, मुलाखत लेखन, समीक्षा लेखन, सूत्रसंचालन, अपील, ब्लॉग आणि अहवाल लेखन यावर काम करा. तुमची उत्तरे स्पष्ट असावीत. ती प्रस्तावना, मुख्य परिच्छेद आणि निष्कर्षांसह सुव्यवस्थित असल्याची खात्री करा. विविध प्रश्न प्रकार आणि टेन्प्लेट चा सराव करा.

4. Revise Grammar:

Review grammar rules, including tenses, sentence structure, and parts of speech, prepositions, reported speech, practice exercises on correction of sentences, transformation of sentences, etc.

व्याकरणाच्या नियमांचे पुनरावलोकन करा, ज्यात काल, वाक्य रचना, वाक्ये सुधारण्यासाठी सराव, वाक्यांचे परिवर्तन इ. वर लक्ष द्या.

5. Focus on Literature/Poetry Section, Novel section:

Read all prescribed texts thoroughly. Understand the themes, characters, and literary devices used. Practice answering questions in a clear and concise manner.

सर्व टेक्स्ट बुक नीट वाचा. विविध प्रकरणातील थीम, पात्र आणि भाषालंकार समजून घ्या. स्पष्ट आणि अचूक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करा.

6. Improve Vocabulary:

Enhance your vocabulary by learning new words daily. Practice using them in sentences. This will help in writing and speaking sections. Do solve different vocabulary activities.

दररोज नवीन शब्द शिकून तुमचा शब्दसंग्रह वाढवा. ते वाक्यात वापरण्याचा सराव करा. यामुळे तुमचे लेखन आणि संभाषण सुधारेल. विविध शब्दसंग्रह कृती सोडवा.

7. Time Management:

Practice previous years' question papers within the given time. This will help you manage time effectively during the actual exam.

दिलेल्या वेळेत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सोडवण्याचा सराव करा. हे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान वेळेचे व्यवस्थापन करण्यात मदत करेल.

8. Seek Feedback:

Get your writings and answers reviewed by teachers or peers. Constructive feedback will help you improve.

शिक्षक किंवा समवयस्कांकडून तुमचे लेखन आणि उत्तरांचे पुनरावलोकन करा. रचनात्मक अभिप्राय तुम्हाला सुधारण्यात मदत करेल.

9. Stay Calm and Positive:

Maintain a positive mindset. Regularly revise but also take breaks to relax. Ensure you get enough sleep before the exam day. Hear music and spend time in creative activities.

सकारात्मक मानसिकता ठेवा. नियमितपणे उजळणी करा परंतु आराम करण्यासाठी ब्रेक देखील घ्या. परीक्षेच्या दिवसापूर्वी तुम्हाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री करा. संगीत ऐका आणि सर्जनशील क्रियाकलापांमध्ये वेळ घालवा.

10. Exam Strategy:

Read the question paper thoroughly before starting. Plan your answers and allocate time for each section. Begin with the sections you are most confident about.

सुरुवात करण्यापूर्वी प्रश्नपत्रिका नीट वाचा. तुमच्या उत्तरांचे नियोजन करा आणि प्रत्येक विभागासाठी वेळ द्या. तुम्हाला सर्वात सोप्या वाटत असलेल्या विभागांपासून सुरुवात करा.

By following these tips, you can approach your English board exam with confidence and achieve success.

-Prof. Shweta Patil

Government Higher secondary Ashram school Kalam Devi, Dahanu Dist. Palghar


Special Tips- How to get good marks in English Subject

1) Study English for one hour daily.

दररोज एक तास इंग्रजीचा अभ्यास करा.

2) Read Prose topics and remember/ write the story/ content of the topic.

गद्य विषय वाचा आणि त्या विषयाची कथा/ सामग्री लक्षात ठेवा/ लिहा.

3) Read poems and remember name of the poem and poet, central Idea, poetic device, content of the poem, special features of the poem.

कविता वाचा आणि कविता आणि कवीचे नाव, मध्यवर्ती कल्पना, काव्यात्मक रसग्रहण, व कवितेची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा.

4) Remember the format of the English activity sheet(Question paper).

इंग्रजी कृती पत्रिकेचा आराखडा लक्षात ठेवा.

5) Read summary of the novel extract and answers of the question based on each novel topic.

प्रत्येक कादंबरीचा सारांश आणि प्रश्नाची उत्तरे वाचा.

6) Make a list of major characters of each novel extract and remember their specialties / qualities.

प्रत्येक कादंबरीच्या प्रमुख पात्रांची यादी तयार करा आणि त्यांची वैशिष्ट्ये/गुण लक्षात ठेवा.

7) Remember the story of each novel.

प्रत्येक कादंबरीची कथा लक्षात ठेवा.

8) Out of 12 writing skill topics, become master in four.

बारा लेखन कौशल्य विषयांपैकी चार विषयांमध्ये मास्टर व्हा.

My suggestions-

a) Drafting a virtual message

b) Framing interview questions

c) Expansion of idea

d) Film review/ appeal

9) Solve Grammar sentences daily.

व्याकरणाची वाक्ये रोज सोडवा.

Prof. Tushar Chavan

Rashtriya Junior College,

Chalisgaon Dist. Jalgaon


Other Useful Tips- How to get good marks in English Subject

Useful and practical suggestions to score maximum marks in English in the short period. These tips are given by different teachers from all over Maharashtra.

कमी कालावधीत उत्तम गुण मिळावेत या साठी उपाय-

1) Students should know central idea of novels.

2) Students should memorize and draw proper format of email, blog, Appeal, virtual message etc.

e.g. Blog

Header 1 mark

Footer 1

Content 2

Easy to draw and write

Basic knowledge is expected.

3) Students must refer to the board's previous activity sheets.

4) Read the novel section keeping in mind the elements of the novel. The plot (story) and characters are the key. They must remember the theme and personalities/sketches of the important characters. Must logically deal with the novel section especially Q.5 B,C and D.

5) Time management is essential for our language paper because writing skill and novel section questions are vast.

6) If you solve prose section thoroughly you will get maximum marks.

7) In writing skill question, like summary writing or mind mapping you will get good marks definitely.

8) Read the summary of each novel so that you can write easily .

9) Practice previous year question paper. Solve at least five question papers.

10) Students must attempt every question given in the activity sheet (seen, unseen, poetry).

11) Students should focus on grammar part.

12) Summary writing activity questions should be written properly. While writing the summary don't forget to give the title (though mark is not allotted to it. Write the summary of the given passage in the sequence of answers written to the questions asked on the passage including sentences of your own, grammatically correct with proper vocabulary.

13) Prepare mind mapping activity properly. It is easy topic.

14) Prepare all the poems well for dealing with activities and appreciation.

15) Write the appreciation of the poem using points as headings.

16) Prepare thoroughly reading 4.1 History of English Novel.

17) Understood the central idea and theme of all the novels with major characters and character traits.

18) For writing skills attempt Expansion of ideas, Film review, interview questions and drafting a virtual message.

19) English is the most important scoring subject as compared to others. So, remove fear of English subject.

-If someone wants to score good marks, he/she must follow the guidelines.

- Be confident.

-Understand the Syllabus

-Analyze the syllabus.

-Go through the textbook and note down important information from prose, poetry and novel section.

-Enjoy literature and Prose

-Read and summarize each prose topic and poem.

-Understand themes, characters and main ideas.

-Solve Question Bank

-Solve previous year Board’s question papers.

-Practice Writing Skill topics and Grammar

-Focus on spent time per section during solving the question papers.

20) Solve at least five English question papers and check it from your English teacher.





Special Article-

बारावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने इंगजी विषयाची कशी तयारी करावी हे वाचा-

लवकरच उपलब्ध होईल 


Writing answers in the exam-

बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयाची उत्तरे कशी लिहावीत ते जाणून घ्या.

👇

ललकरच उपलब्ध होईल 


Use following Activity Work Book for getting maximum marks in Std. XII English-

Price Rs. 400

Courier Rs. 50

Total Rs. 450

Send amount Google Pay or Phone Pay to-

9850737199 (Prof. Tushar Chavan)


Saturday, 21 June 2025

Maharashtra State Board App

Maharashtra State Board App

MSBSHSE – App

MSBSHSE APP - राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व सुविधा यासाठी मंडळाने 'एमएसबीएसएचएसई हे मोबाइल app विकसित केले असून, बोर्ड परीक्षेची संपूर्ण माहिती मिळवणे यामुळे सुलभ होणार आहे.

Maharashtra State Board App - Layout

Maharashtra State Board App

Maharashtra State Board App- 

एमएसबीएसएचएसई app कसे डाउनलोड करावे?

परीक्षा बोर्ड एमएसबीएसएचएसई हे app गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध दिले आहे.

विद्यार्थी किंवा पालक हे app डाउनलोड करून वापरू शकतात.

यात लॉगीन करण्यासाठी मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी लागणार आहे

The Maharashtra State Board app is a one-stop solution for all HSC and SSC related information.

Whether you're a student, institute, or employee, this app provides you with the latest timetables, notifications, and essential board links.


The app contains-

Student Login

Institute Login

Employee Login


In each login various important information is available.

In student login, time table of the latest Board Exam is available.

In institute login, Internal or Practical marks filling is available.


एमएसबीएसएचएसई APP ची वैशिष्ट्ये-  

✍️ गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध  

✍️ विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगीन उपलब्ध  

✍️ नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यासह सर्व बाबींचा समावेश  

✍️ फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुणांसह अन्य सुविधा शाळांसाठी उपलब्ध  

✍️ अन्य नवीन सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगीनशिवाय उपलब्ध


Download the app from Google Play Store and use it.


Link-

👇

MSBSHSE Mobile App (Click and Download)


See More-

Std. XII English Activity Workbook