Webinar for Std. XII Board Exam
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी पुरवणी परीक्षा मार्गदर्शन वेबिनार 2024
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मंडळ मार्च 2024
मधील इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेत यश मिळावे म्हणून पूरक साहित्याचे विकसन करण्यात आले आहे.
सदर साहित्याचा उद्देश विद्यार्थ्याना कठीण वाटणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत करणे हा होय.
सदर साहित्य इयत्ता दहावी आणि बारावीच्या मराठी,
इंग्रजी,
उर्दू,
विज्ञान,
गणित आणि सामाजिक शास्त्रे या प्रमुख विषयांसाठी करण्यात आले आहे.
सदर सर्व साहित्य www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पूरक साहित्याच्या वापराविषयी दि.१४ जून, 2024
रोजी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या अनुत्तीर्ण विद्यार्थ्याना पुरवणी परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यातील तज्ञ विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा, त्यांचे शंका- समाधान व्हावे या उद्देशाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 2 जुलै, 2024 ते दि. 5 जुलै, 2024 आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 8 जुलै, 2024 ते दि.11 जुलै, 2024 या कालावधीत ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता दहावी प्रमाणे च बारावी साठी पण मार्गदर्शन आयोजित केले आहे.
इयत्ता बारावी पुरवणी परीक्षा मार्गदर्शन वेबिनार नियोजन-
दि.08 जुलै, 2024
सकाळी 11 ते दुपारी 12.30
- गणित व संख्याशास्त्र (विज्ञान व कला शाखा)
दुपारी 1 ते 2.30
- इंग्रजी
दुपारी 3 ते 4.30
- भौतिकशास्त्र
See video-
-------------------------------------------------
----------------------------------------------------------------
दि.9 जुलै, 2024
सकाळी 11 ते दुपारी 12.30
- गणित व संख्याशास्त्र (विज्ञान व कला शाखा)
दु. 1 ते 2.30
- उर्दू
दु.
3 ते 4.30 -
रसायनशास्त्र
See video-
-------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
दि.10 जुलै, 2024
सकाळी 11 ते दुपारी 12.30
- गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य शाखा)
दु.1 ते 2.30
- सामाजिक शास्त्र
दुपारी 3 ते 4.30
- जीवशास्त्र
See Video -
---------------------------------------------
----------------------------------------------------------------------
दि.11 जुलै, 2024
स 11 ते दुपारी 12.30
- मराठी
दुपारी 1 ते 2.30
- गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य शाखा)
दु. 3 ते 4.30
- सामाजिक शास्त्र
See Video-
---------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
उपरोक्त प्रमाणे प्रस्तुत कार्यालयाच्या यु- ट्यूब चॅनेलवर सर्व विषयांचे मार्गदर्शन वेबिनार सत्र प्रक्षेपित होणार असून वेळापत्रकामध्ये दिलेल्या यु -ट्यूब लिंकद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक, पालक इ. सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्या वेळेनुसार यु-
ट्यूब चॅनेलवरील मार्गदर्शन वेबिनार सत्र पाहू शकतात.
राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक,
पालक यांनी या ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन वेबीनार सत्रांचा लाभ घ्यावा.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.
No comments:
Post a Comment